न्यूयॉर्क – गेल्या काही दिवसांपासून सुर्यात महाकाय काळे खड्डे तयार पोहत आहे. हे खड्डे एखाद्या मोठ्या दरीसारखे खोल आणि मोठे आहेत. इतके मोठे की त्यात अनेक पृथ्वी बसू शकतात. त्यांच्या आतून अतिशय वेगाने गरम सौर लहरी बाहेर पडत आहेत. ज्याचा प्रभाव येत्या दोन दिवसांत पृथ्वीवर दिसणार आहेत. त्यांच्यापासून निघणाऱ्या सौर लहरीमुळे समस्या निमार्ण होऊ शकतात.
पहिला खड्डा भारतात छठ उत्सव साजरा होत असताना तयार झाला होता. त्यादिवशी सुर्याचा हसरा पिक्चर रिलीज झाला होता. प्रत्यक्षात तेव्हापासून हे खड्डे तयाक होऊ लागले आहेत. तेव्हापासून सलग चार ते पाच वेळा हे खड्डे तयार झाले आहेत. अलीकडील खड्डा 30 नोव्हेंबर 2022 रोजी दिसला. या खड्ड्याचा परिणाम येत्या दोन दिवसात पृथ्वीवर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुर्याचा परिस्थितीचा आढावा नासा घेत आहे.