संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

सुरेश जैन जामीनानंतर जळगावात सल्लागाराची भूमिका स्वीकारणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव : मुंबई हायकोर्टाने माजी मंत्री सुरेश जैन यांना जामीन मंजूर केल्यानंतर ते आज जळगावात परतले. जळगावकरांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आगामी राजकारणात सक्रिय होणार नसून सल्लागाराचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. जळगावच्या राजकारणात ते तब्बल 40 वर्षे सक्रिय होते.मात्र घरकुल घोटाळ्याप्रकरणी त्यांना 2012 मध्ये अटक करण्यात आली होती.त्यानंतर 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर झाला होता मात्र त्यांना मुंबईतच राहण्याची अट घालण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टात धाव घेतली असता 30 नोव्हेंबर रोजी नियमित जामीन मंजूर झाला असून ते आज जळगावात परतले.

सुरेश जैन आज जामीनानंतर जळगावात परतले असून त्यांचे जळगावकरांनी उत्साहात स्वागत केले. पुष्पवृष्टी तसेच फटाक्याची आतिश बाजी करत शेकडो कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात आणि रेड कार्पेट अंथरुन जळगाव रेल्वे स्टेशनवर जैन यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना सुरेश जैन म्हणाले, मला प्रचंड आनंद झाला. माझ्या कर्मभूमीत आलो, माझ्या लोकांमध्ये आलो.जळगावमध्ये मी ९ निवडणुका लढलो आणि या ९ निवडणुकांमध्ये लोकांनी मला मोठ्या मताधिक्क्याने विजयी करुन दिले. त्यामुळे मी या प्रेमाचा आयुष्यभर ऋणी राहील.आगामी राजकीय वाटचालीबाबत अद्याप काहीच विचार केला नाही. परंतु माझा विचार आहे की मी आता ८० व्या वर्षात आलो आहे. मी जवळगावची ४० ते ४५ वर्षे सेवा केलेली आहे. त्यामुळे आता माझा स्वतःचा, घरच्यांचा आणि मित्रमंडळींचाही सल्ला आहे की आपण आता सल्लागाराच्या भूमिकेत राहायला हवे.सल्ल्यासाठी जो कोणी आपल्याकडे येईल मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला सल्ला देण्याचा प्रयत्न करेन.परंतु राजकीय दृष्ट्या सक्रिय राहण्याचा माझा अजिबात विचार नाही,असे सुरेश जैन म्हणाले.शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनीही त्यांची भेट घेतली.
जळगावमधील 29कोटी 59लाखांच्या घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन 2012 साली अटक करण्यात आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami