संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

सुप्रीम कोर्टाला मिळाले
पाच‌ नवीन न्यायाधीश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*डीवाय चंद्रचूड यांनी दिली शपथ

नवी दिल्ली : – सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आज पाच न्यायाधीशांना सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सहा सदस्यीय कॉलेजियमने गेल्या वर्षी या पाच नावांची शिफारस केली होती. या पाच नवीन न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती पंकज मित्तल, न्यायमूर्ती संजय करोल, न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार, न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ३२ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकूण पदसंख्या ३४ आहे.डिसेंबर २०२२ मध्ये ६ सदस्यीय कोलॅजिअने या पाच न्यायाधीशांच्या नावाची शिफारस केली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयात २८ न्यायाधीश कार्यरत आहेत. त्यापैकी ८ न्यायाधीशांचा कार्यकाळ २०३३ मध्ये संपणार आहे.
न्यायपालिका आणि सरकार यांच्यातील संघर्षामुळे चर्चेत आलेल्या तसेच मागील दोन महिन्यांपासून रेंगाळलेल्या सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या नियुक्तीला अखेर सरकारने मान्यता मिळाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली.”भारताच्या राज्यघटनेतील तरतुदींनुसार, राष्ट्रपतींनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. मी संबंधित सर्वांना शुभेच्छा देतो”, असे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या