संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मराठा आरक्षणावर मागास आयोगाचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांवरील निकालानंतर मराठा आरक्षणाबाबत सुनावण्या घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने घेतला आहे. आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयोगाचे सदस्य बी. एल. सागर किल्लारीकर आणि लक्ष्मण हाके बैठकीला उपस्थित होते.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडे अनेक संघटनांचे अर्ज आले आहेत. त्यासंदर्भात आयोगाने सोमवारी बैठक आयोजित केली होती. छावा संघटनेच्या मराठवाडा विभागाचे राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, प्रा. गोपाळराव चव्हाण, सचिन गावंडे, राजाभाऊ जाधव यांनी या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत आपले म्हणणे आयोगासमोर मांडले. तथापि कोल्हापूरमधील काही मराठा संघटनांनी सुप्रीम कोर्टातील याचिकांवरील निर्णयाशिवाय आयोगाने सुनावणी घेऊ नये, अशी विनंती केली. त्यानुसार आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आयोगाकडील अर्जांवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर राज्य मागासवर्ग आयोग आलेल्या याचिकावर सुनावणी घेणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami