संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

सीमा सुरक्षा दलाने अमृतसरच्या सीमेवर पाकिस्तानी ड्रोन पाडले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमृतसर – सीमा सुरक्षा दलाने सोमवारी रात्री मोठी कारवाई केली. भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अमृतसरजवळच्या सीमेजवळ भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणारे पाकिस्तानचे ड्रोन पाडले. गेल्या चार दिवसांत सीमा सुरक्षा दलाने पाडलेले हे तिसरे पाकिस्तानी ड्रोन आहे. त्यामुळे पाकिस्तानचा घातपाताचा डाव उधळला.
पंजाबच्या अमृतसर जवळच्या भारत पाकिस्तान सीमेवरील छना गावाजवळ पाकिस्तानी ड्रोनने काल रात्री ८.३० च्या सुमारास भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ते पाडले. या ड्रोनमध्ये अंमली पदार्थांची २ पाकिटे सापडली. यावरून पाकिस्तान रात्रीच्या अंधारात ड्रोनमार्फत अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे उघडकीस आले. सीमा सुरक्षा दलाच्या १८३ व्या बटालियनने कलाम डोंगर भागात हे पाकिस्तानी ड्रोन पाडले. चार दिवसांमध्ये सीमा सुरक्षा दलाने पाडलेले हे तिसरे पाकिस्तानी ड्रोन आहे. त्यामुळे पाकिस्तानचा घातपाताचा आणि अंमली पदार्थ भारतात पाठवण्याचा डाव उधळला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami