नवी दिल्ली : मद्य घोटाळाप्रकरणी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यांनंतर अखेर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंत्रिमंडळातील आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तर दुसरीकडे सत्येंद्र जैन यांना याआधीच अटक करण्यात आली होती. सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. अरविंद केजरीवाल यांनी जैन यांचा राजीनामा घेतला नाही म्हणून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. अखेर त्यांचा देखील राजीनामा अरविंद केजरीवाल यांनी स्वीकारला आहे.