संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

सिल्व्हर ओकवर एमसीए निवडणूक
बैठक! आशिष शेलार अचानक माघारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक 28 सप्टेंबरला होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एमसीए निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी भाजपा नेते आशिष शेलार सिल्व्हर ओकपर्यंत आज आले, पण माध्यमांचे कॅमेरे बघताच आशिष शेलार सिल्व्हर ओकच्या बाहेरून माघारी फिरले.
क्रिकेटच्या मैदानातही फडणवीस-पवार यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी एमसीए निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संदीप पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत.
शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबादेखील संदीप पाटील यांना आहे, असे बोलले जाते. तर अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. संदीप पाटील यांना मागच्यावेळीही एमसीएची निवडणूक लढवायची होती, पण काही अटी आणि अडचणींमुळे त्यांना ही निवडणूक लढवता आली नाही. यंदा एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 5 उमेदवार आहेत.
संदीप पाटील, विजय पाटील, अमोल काळे, मिलिंद नार्वेकर आणि नवीन शेट्टी हे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असले तरी खरी चुरस मात्र संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात असणार आहे. डॉक्टर विजय पाटील हे सध्या एमसीएचे अध्यक्ष तर अमोल काळे हे सध्या एमसीएचे उपाध्यक्ष आहेत. आशिष शेलार हे 2017-18 साली एमसीएचे अध्यक्ष होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami