संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

सिमेंटमध्येही अदानींचा दबदबाअंबुजा-एसीसीची खरेदी पूर्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- गौतम अदानी समूहाने अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडमधील हिस्सेदारी खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे अदानी समूह आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सिमेंट उत्पादक बनला आहे. दोन्ही कंपन्यांमधील भागीदारी अदानी समूहाने ६.५० अब्ज डॉलर्सला खरेदी केली आहे.

अदानी उद्योग समूहाने अंबुजा सिमेंटची ६३.१५ टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. एसीसी लिमिटेडची ५६.६९ टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. या दोन्ही कंपन्यांची हिस्सेदारी सेबीच्या नियमानुसार खरेदी केली आहे. ६.५० अब्ज डॉलर्सला हा व्यवहार झाला. होल्सिमच्या हिश्शाचाही त्यात समावेश आहे. अदानी समूहाने या दोन्ही सिमेंट कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी केल्यामुळे तो आता देशात दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक समूह बनला आहे. यात आणखी वेगाने प्रगती करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. २०५० पर्यंत भारत जगात सिमेंट उत्पादनात प्रमुख देश बनेल, असा विश्वास अदानी समूहाने व्यक्त केला. अंबुजा सिमेंट आणि एसीसीची सध्या वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमता ६.७५ कोटी टन आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami