संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – नाशिक जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला.सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते.तसेच, बाजारपेठांमध्येदेखील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच,पाण्यात अडकलेल्या ४० नागरिकांना पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून जेसीबीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.५० वर्षांनंतर पहिल्यांदा एवढा पाऊस झाल्याचे सिन्नरकर नाशिक शहरातदेखील दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला.त्यामुळे गंगापूर धरणातून ७ दिवसांनंतर ३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.यामुळे अनेक लहान-मोठे मंदिर हेदेखील पाहण्याखाली गेली आहेत. तसेच,गोदाकाठ परिसरात असलेल्या व्यापारी व्यावसायिकांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे.आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी तब्बल ७५.४० टीएमसी पाण्याच्या विसर्ग झाला आहे.नाशिक शहरातील सर्वच धरणे ही शंभर टक्के भरले आहेत.तसेच गंगापूर, दारणा,कडवा,भोजपूर, पालखेड,मुकणे,वालदेवी, आळंदी,नांदूरमध्यमेश्वर धरणातून कमी अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami