संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

सिधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेची निवणूक चुरशीची होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक यावर्षी २४ जुलै रोजी होणार असून त्यासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ जून रोजी संपली.यामध्ये १५ जागांसाठी एकूण ३७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून ही निवडणूक यंदाही चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आता अर्ज मागे घेण्याची तारीख ११ जुलै रोजी दुपारी तीनपर्यंत आहे.या निवडणुकीत २०८० मतदार आपला मतदानाचा हक्क बनवणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नेहमी अटीतटीची होत असते. मात्र,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला ७ वर्षे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. असे असले तरी पाच वर्षांपुर्वी आजी-माजी संचालक मंडळाने बिनविरोध निवडणुकीची संकल्पना राबवून अडीच वर्षांनी पहिल्या संचालकांनी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या फळीतील उमेदवारांना संचालकपद अडीच वर्षांनी रिक्त करून द्यावयाचे होते; परंतु निवडणूक नियमांचा आधार घेत एकाही संचालकाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे अनेक उमेदवार नाराज आहेत.दरम्यान,अर्जाची छाननी काल झाली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ११ जुलै आहे. मतदान २४ जुलै रोजी तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ जुलै रोजी होणार आहे.निवडणुकीसाठी आठ तालुका मतदार संघ आहेत.तर पाच राखीव मतदार संघ आणि दोन महिला राखीव मतदार असंघ आहेत.तर अन्य जाती वर्गासाठी प्रत्येकी एक जागा राखीव सोडण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami