संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 26 September 2022

सिद्धू मूसवाला हत्याकांडातील नवीन व्हिडीओ समोर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंदीगड – पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे पुरावे समोर येत आहेत. आता हत्येत वापरण्यात आलेल्या अल्टो कारचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे फुटेज मुसेवालाच्या हत्येनंतरच्या ९ तासांचे आहे. आता या फुटेजमुळे अनेक खुलासे होण्याची अपेक्षा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसते की, मानसापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर एक अल्टो कार मोगाच्या पेट्रोल पंपावर सुमारे ३ वाजून १५ मिनिटे २९ सेकंदांनी उभी आहे. ही तीच कार आहे ज्यातून गोळीबार करणारे पळून गेले होते. कारच्या पुढच्या सीटवर दोन लोक बसलेले दिसतात. ड्रायव्हिंग सीटवर बसलेला शूटर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला हाताच्या इशाऱ्याने बोलवतो आणि पेट्रोल भरण्यासाठी पैसे देतो. पेट्रोल पंपाचा कर्मचारी पैसे घेऊन कारमध्ये पेट्रोल भरतो, त्यानंतर शूटर गाडी घेऊन निघून जातात. गोळीबार करणारे सुमारे २ मिनिटे पेट्रोल पंपावर थांबले मात्र पोलिसांना त्याची माहितीही नव्हती. पेट्रोल भरल्यानंतर शूटर्स पुढे जातात आणि यू-टर्न घेतात आणि नंतर हायवेवर निघून जातात. नंतर हे सर्व आरोपी कार धरमकोट राष्ट्रीय महामार्गावर सोडून पळून गेले. मुसेवालाच्या हत्येनंतर पोलिसांनी महामार्गावरून कार जप्त केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami