सिडनी- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा सुरु झाला आहे. ओमिक्रॉनचे व्हेरिएंट पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात क्रूझ जहाजामध्ये तब्बल 800 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे सिडनी शहरात हे जहाज थांबवण्यात आले.
मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रूझ जहाज न्यूझीलंडहून निघाले होते आणि त्यात सुमारे 4,600 प्रवासी आणि चालक दल होते. क्रूझ ऑपरेटर मार्गुरिट फिट्झगेराल्ड यांनी सांगितले की, हा प्रवास 12 दिवसांचा होता. यामध्ये मोठ्या संख्येने लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कंपनीचे अध्यक्ष मार्गुराइट फिट्झगेराल्ड यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातही कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. 2020 च्या सुरुवातीला याच कंपनीच्या रुबी प्रिन्सेस क्रूझ शिपमध्ये सुमारे 900 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामध्ये सुमारे 28 जणांचा मृत्यू झाला होता.कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.