सिडनी- ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील टारोंगा प्राणी संग्रहालयातून बुधवारी पहाटे पाच सिंह पळाले. या घटनेची माहिती मिळताच प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी परिसर सील केला. त्यानंतर चार तासांनी या सिंहांना पुन्हा प्राणी संग्रहालयात परत आणण्यात यश आले.
काही लोकांनी आज पहाटे 6.30 वाजता पाच सिंहांना टारोंगा प्राणी संग्रहालयाच्या बाहेर पाहिले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच टारोंगा प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची चांगलीच भाबंरी पडाली. त्यानंतर त्यांनी प्राणी संग्रहालयाच्या आजूबाजूच्या परिसर सील केला. त्यानंतर बरीच शोधाशोध सुरु असताना अधिकाऱ्यांना चार तासांनी पाच सिंह दिसले आणि त्यात चार सिंहांच्या बछड्यांना सहजरित्या प्राणी संग्रहालयात नेले. मात्र वयस्कर सिंहाला प्राणी संग्रहालयात नेण्यासाठी प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. हे सिंह प्राणी संग्रहालयातून कसे पळाले ?, याची चौकशी अधिकारी करत आहे.