संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 26 September 2022

सिंहगडवर मधमाशांच्या हल्ल्यात पर्यटक बेशुद्ध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्‍ला केल्याने आज दुपारी एकच गोंधळ उडाला. या हल्ल्यात 8 ते 10 पर्यटक जखमी झाले तर 2 पर्यटक बेशुद्ध झाले आहे.
सिंहगडावर कल्याण दरवाजाजवळील झाडावर मधमांशांचे पोळी लागले होते. एका तरुणाने पोळ्यांजवळ जाऊन मोबाईलने सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत केला. मात्र पोळी सेल्फीत येत नसल्याने तरुण अधिकजवळ जाण्याच्या प्रयत्न करत होता. त्यावेळी झाडाची फांदी तुटली आणि मधमाशासह एक पोळं खाली पडले. तरुणही खाली पडला आणि मधमांशांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. मधमाशांनी इतर पर्यटकांवर भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात 2 जण बेशुद्ध पडले. तर 8 ते 10 पर्यटक जखमी झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami