संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 26 March 2023

सिंधुदुर्गामध्ये डंपरची पाच महिलांना धडक! एकीचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गातील काळसे येथे भरधाव डंपरने शेतातून काम करून घरी परतणाऱ्या पाच महिलांना धडक दिल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी घडली. या धडकेत डंपरखाली सापडून महिलांचा जागीच मृत्यू झाल्याने गावात शोककाळा पसरले आहे. तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहे. रुक्मिणी काळसेकर असे या महिलेचे नाव आहे.

काळसे येथील शेतातून काम करून पाच महिल आपल्या घरी परतत होत्या. त्यावेळी त्यांना कुडाळहून मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने चिरडले. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघड झाले असून या धडकेत डंपरखाली सापडून रुक्मिणी काळसेकरांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या. चौघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मालवण पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या