संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

सिंधुदुर्गात तुफान पाऊस २६ गावांचा संपर्क तुटला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंधुदुर्ग- मुसळधार पावसाने सिंधुदुर्गला झोडपून काढले आहे. दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आला आहे. आंबेरी पूल पाण्याखाली गेल्यामुळे माणगाव खोऱ्यातील २६ गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात पूल बुडाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग आणि परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. माणगाव खुराना भागात झालेल्या जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. आंबेरी पुलावरून पाणी गेल्यामुळे पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे माणगाव खोऱ्यातील २६ गावांचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला आहे. आंबेरी पुलावर गाड्या अडकून वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र त्याचा जोर काहीसा कमी झाला आहे. परंतु जिल्ह्यातील पूर परिस्थिती कायम आहे. माणगाव खोऱ्यातील शिवापूर, उपवडे, आंजीवडे, महादेवाचे केरवडे, पुळास, माणगाव, वाडोस, गोठोस, दुकानवाढ, हळदीचे नेरूर, वसोली, साळगाव, आंबेरी, कादोळी, मोरे आदी भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर भागातही पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami