संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

साहित्यातील नोबेल पारितोषिक फ्रेंच लेखिका एरनॉक्स यांना जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

स्टॉकहोम- जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार नोबेल पारितोषिक हा आहे. यंदाचा साहित्याचे नोबेल नुकतेच फ्रेंच लेखिका ॲनी एरनॉक्स यांना जाहीर झाला आहे. ॲनीचा जन्म 1 सप्टेंबर 1940 रोजी झाला. त्या फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका आहे. त्यांचे साहित्यिक कार्य बहुतेक आत्मचरित्रात्मक आणि समाजशास्त्रावर आधारित आहे.

रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केल्या जातो. यापूर्वी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कॅरोलिन बर्टोझी, कोपनहेगन (डेनमार्क) विद्यापीठाचे मॉर्टन मीलडोल आणि के. बॅरी शार्पलेस यांना दिले. क्लिक रसायनशास्त्र आणि बायोर्थोगोनल रसायनशास्त्राच्या विकासासाठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

2022 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारही जाहीर झाला आहे. क्वांटम मेकॅनिक्स क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल या वर्षी हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना देण्यात आला. फ्रान्सचे शास्त्रज्ञ एलेन आस्पेक्ट, अमेरिकेचे जॉन एफ क्लॉजर आणि ऑस्ट्रियाचे अँटोन जेलिंगर यांना 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे 7.5 कोटी रुपये) मिळणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami