मुंबई- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालायवर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच पंडित जवाहरलाल नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर लावण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
पुणे काँग्रेस भवनातील भारत जोडो याञा वाहनावरील राहुल गांधी यांच्या फोटोलाही काळ फासलं. तसच नेहरू यांनीही माफी मागितल्याचे पोस्टर लावले होते ते सर्व पोस्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लगेच काढूनही टाकले. पुणे पोलिसांनी याप्रकरणी 15 भाजप कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत. काही काळ जोरदार घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्याने परिसर दणाणून गेला.त्यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच पंडित जवाहरलाल नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर लावण्यात आले.तसच नेहरू यांनीही माफी मागितल्याचे पोस्टर लावले होते.मात्र ते सर्व पोस्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लगेच काढूनही टाकले. काही काळ जोरदार घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक कर्वे रस्ता डेक्कन येथे आंदोलन करण्यात आले होते. तत्पूर्वी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने हे पोस्टर्स मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सावरकरांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले.मात्र सावरकरप्रेमींकडून हे बॅनर्स हटवण्यात आले.अशा प्रकारे बॅनर लावणाऱ्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी भावना बॅनर्स हटवणाऱ्या या व्यक्तीने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.