संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 09 February 2023

सावधान! शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दुसऱ्याकडे पैसे देताय? तुमचीही होईल अशी फसगत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शेअर बाजारात कसं उतरायचं? तिकडे कशी गुंतवणूक करायची याविषयी अनेकांकडे ज्ञान नसतं. त्यामुळे अनेक जण इतर गुंतवणूकदारांकडे आपले पैसे देतात आणि त्यांना गुंतवायला सांगतात. मात्र अशा वेळी मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असते. असाच प्रकार औरंगाबाद येथे घडला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कार्यालयातील कर्मचारी गोरखनाथ शिंदे यांची तब्बल २८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील हर्सूल येथे राहणारे गोरखनाथ शिंदे यांची ओळख ज्ञानदेव नारेळे यांच्याशी ओळख झाली. डीएसएन ट्रेड वर्ल्ड या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचा दावा ज्ञानदेव यांनी केला होता. त्यामुळे शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून सुरुवातीला वैयक्तिक कर्ज काढून १२ लाख रुपये ज्ञानदेव यांच्या खात्यावर पाठवले. यानंतरही नारळेने ८ महिन्यांत पैसे परत करण्याच्या बोलीवर अधिक पैसे देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शिंदेंनी खासगी पतसंस्थेचे कर्ज घेऊन २ लाख रुपये नारळेस दिले. त्यानंतर काही दिवसांनी नारळे याने आणखी पैशांची मागणी केल्यानंतर शिंदे यांनी मित्राकडून हातउसने घेऊन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी नारळेच्या कार्यालयात नेऊन १० लाख ५० हजार रुपये रोख दिले. त्यानंतर ३० मे रोजी २ लाख रुपये रोख दिले, असे एकूण २८ लाख रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

एवढे पैसे देऊनही परतावा न मिळाल्याने शिंदे यांनी पैशांचा तगादा लावला. तेव्हा त्यांनी ४ लाख रुपये परत केले. त्याच्याकडे मुद्दल २४ लाख रुपये बाकी आहेत.

सतत पैशांची मागणी केल्यानंतर त्याने शिंदेंच्या नावाने १० व पत्नीच्या नावे १५ लाखांचे धनादेश दिले. तसा नोटरी करारनामासुद्धा केला आहे. यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर शिंदेंनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्याठिकाणी चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक सहाय्यक निरीक्षक शिवाजी चौरे तपास करीत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami