सावंतवाडी- सावंतवाडी तालुक्याच्या सोनुर्ली गावातील देवीचा जत्रोत्सव ९ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. त्याची जोरदार तयारी गावात सुरू आहे. भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिसरात हा जत्रोत्सव ओळखला जातो. सोनुर्लीच्या देवीचा जत्रोत्सव दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात असतो. यंदा तो दुसऱ्या आठवड्यात बुधवारी ९ नोव्हेंबरला होणार आहे. त्याची जोरदार तयारी गावात सुरू आहे. भाविक आणि व्यावसायिकांची सध्या धावपळ सुरू आहे. मुले, विद्यार्थी, महिला आणि इतरांची या जत्रा उत्सवाची तयारी सुरू आहे. लोटांगणाचा जत्रोत्सव म्हणून तो प्रसिद्ध आहे. देवी नवसाला पावते, असे भाविक मानतात.