संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

सावंतवाडीची १२ सप्टेंबरला आमसभा दुसर्‍यांदा रद्द !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सावंतवाडी – राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत १२ सप्टेंबरला होणारी सावंतवाडी तालुक्याची आमसभा आता पुन्हा दुसर्‍यांदा रद्द करण्यात आली आहे.मंत्रालयीन कामकाज असल्यामुळे ही सभा तूर्त रद्द केल्याचे सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी सांगितले.
यापूर्वी ही सभा शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी आयोजित केली होती.परंतु त्यादिवशी अनंत चतुर्दशी असल्यामुळे ती सभा पुढे घ्यावी,अशी मागणी तालुक्यातून केली होती.त्यानंतर १२ सप्टेंबर रोजीचे नियोजन केले होते. मात्र आता यादिवशी मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याने ही आमसभा पुन्हा रद्द करावी लागत आहे.तब्बल सात वर्षांनी ही सभा होणार असून त्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा होणार होती. दरम्यान,या आम सभेची पुढील तारीखही अद्यापपर्यंत ठरवली नसून ती तारीख लवकरच जाहीर केली जाईल,अशी माहिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami