संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 26 March 2023

सार्वजनिक बांधकाम विभागातील सचिव नवघरेंचा अकाली मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. काळा घोडा परिसरातील एका हॉटेलमध्ये ते जेवण करत असताना त्यांना अस्वस्थपणा वाटला. उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

नवघरे हे ५७ वर्षांचे होते. काळाघोडा परिसरातील तृष्णा हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवण करत होते. जेवण करताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात अ‍ॅलर्जीमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय वर्तवण्यात येत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ‘वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा अहवाल मिळालेला नाही. त्यामुळे अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू झाला की आणखी कोणत्या कारणाने याचा तपास सुरू आहे,’ अशी माहिती माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या