संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

सानपाड्यामध्ये हॉर्न वाजण्यावरुन तरुणाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी मुंबई : सानपाड्यात हॉर्न वाजवण्यावरुन दुचाकीस्वाराला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रस्त्यातच गाडी पार्क केल्याने मागून येणाऱ्या दूचाकीस्वाराने वारंवार हॉर्न वाजवल्यानंतर गाडीतील तिघांनी मिळून दूचाकीवरील गौरेश चिखलीकरला मारहाण केली. त्या तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून यात एका महिलेचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,गौरेश सानपाडा मोराज सर्कल येथे दुचाकीने जात असताना एक गाडी रस्त्यातच पार्क केली होती.त्यामुळे दुचाकीला पुढे जाता येत नव्हते.या गाडीत काही लोक बसल्याचे लक्षात आल्याने गौरेश यांनी एक दोन वेळा दुचाकीचा हॉर्न वाजवला. मात्र तरीही गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याची काही हालचाल दिसत नसल्याने त्यांनी पुन्हा काही वेळा हॉर्न वाजवला. त्यावेळी मात्र गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन गौरेश यांच्या गाडीला पुढे जाण्यास जागा करून दिली.मात्र अचानक त्या गाडीतील दोन युवक आणि एक महिला खाली उतरली आणि त्यांनी गौरेश याला बेदम मारहाण सुरु केली. त्यातील एकाने गौरेश यांचे हेल्मेट काढून त्यांच्या डोक्यावर चेहऱ्यावर हेल्मेटचे वार केले. त्यात ते जमिनीवर पडले व नंतर तिघे गाडीत बसून निघून गेले.गौरेश यांच्या डोक्याला व डोळ्याखाली  दुखापत झाली आहे. रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडल्यावर त्यांनी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कामत यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami