संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

साधूंना मारहाण करणारे कॉंग्रेसचे कार्यकर्ते! भाजपचा हल्लाबोल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली : सांगली जिल्ह्यात लवंगा येथे ग्रामस्थांनी पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना मुल चोरणारी टोळी असल्याची संशयावरून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील चार साधू हे कर्नाटकमधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान, जत तालुक्यातील एका गावामध्ये त्यांनी एका लहान मुलाला पत्ता विचारला ही बाब तिथे असलेल्या काही ग्रामस्थांनी पाहिली.मुले चोरणारी टोळी असल्याच्या गैरसमजूतीतून यावेळी जमावाने गाडीतून साधूंना रस्त्यावर ओढले आणि मारहाण केली.याप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे.यावरुन भाजपचे नेते राम कदम यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “सांगली येथे साधूंना मारहाण करण्यात आली. हा अपमानास्पद प्रकार घडला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. मग आता काँग्रेसपक्ष देशासमोर सर्व साधू संतांची माफी मागणार का ? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. “काल टाहो फोडणाऱ्या काँग्रेस पक्षाला आज आमच्या साधू संतांची माफी मागावीच लागेल,”असे राम कदम म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami