संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

सात नराधमांकडून दीड वर्ष अत्याचार; तरुणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कल्याण – कल्याण पूर्वेला राहणाऱ्या एका तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सनी, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी काहीजण कल्याणमधील नामांकित बिल्डरची मुलं असल्याचे कळते आहे. आरोपींच्या कुटुंबीयांकडून आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व परिसरात पीडित तरुणी राहत होती. तिला बारावीच्या परीक्षेत ७१ टक्के गुण मिळाले होते, परंतु दोन दिवसांपूर्वी तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. लैंगिक अत्याचाराला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून सात तरुण लैंगिक अत्याचार करत होते. हे नराधम तिला लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करू ,अशी धमकी देत तिच्यावर सतत अत्याचार करत होते. संतापजनक बाब म्हणजे पीडितेची मैत्रिण आरोपींना त्या कामात मदत करत होती. या त्रासालाच कंटाळून पीडितेने दोन दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या मोबाईलमधील सुसाईड नोटच्या आधारे तपास करत कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami