संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील किल्ले वासोटा पर्यटन अखेर सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा- पावसाळ्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील अवघड असणारा व ट्रेकर्सला भुरळ घातलेला किल्ले वासोटा हे पर्यटन स्थळ व ट्रेकिंगसाठी बंद होते.ते आता आज १६ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे,अशी माहिती बामणोलीचे वनक्षेत्रपाल हसबनीस यांनी दिली. त्यामुळे आता कास- बामणोलीसह वासोटा येथे पर्यटन व्यावसायाला पुन्हा एकाद गती येईल अशी आशा येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ११७५ मीटर इतकी आहे.
सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठारापासून पुढे बामणोली येथे वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी एक ते दीड तास पाण्यातून प्रवास करावा लागतो.त्यानंतर नदीकाठावरून घनदाट जंगलातून पुढे ट्रेकला सुरूवात होते.यंदा १६ जून पासून इथले पर्यटन बंद होते.पण आता प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा किल्ले वासोटा ट्रेकिंग पर्यटक व ट्रेकर्स लोकांना खुणावू लागला आहे.या किल्ल्यासह स्वयंभू तीर्थस्थान नागेश्वर, चकदेव आणि पर्वत सुद्धा पर्यटकांना खुला झाला आहे. या सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे.१२ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आता ३० रुपयांऐवजी १०० रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी तापोळा व बामणोली येथूनच पर्यटक वासोट्यावर जावू शकत होते. मात्र, आता भैरवनाथ बोट क्लब बामणोली, ब्रविमश्वर बोट क्लब, शेंबडी मठ, केदारेश्वर बोट क्लब मुनावळे या तीन बोटक्लबमधून जाता येणे शक्य पर्यटकांना झाले आहे. शिवसागर बोट क्लब तापोळा,विशाल बोट क्लब तापोळा, काळेश्वरी बोट वानवली या ठिकाणाहून पर्यटक किल्ल्यावर जातात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami