संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

सातारा-महाबळेश्वर घाट रस्त्यावर दरड कोसळली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा – गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची घटना असताना आज सातारा-महाबळेश्वर घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळून सातारा-महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू असून वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या महाबळेश्वर-सातारा घाट रस्त्यावर आज सकाळी दरड कोसळली. परिणामी हा घाट रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहेत. पावसाळ्यात हा रस्ता किमान चार महिन्यांत दहा ते बारा वेळा बंद होतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami