संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

सातारा जिल्ह्यात डॉल्बीच्या आवाजावरची बंदी कायम

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा: सातारा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून डॉल्बी स्पीकरवर बंदी आहे. मात्र डॉल्बी व्यावसायिक आणि तरुणाईलाही डॉल्बीचं असलेले आकर्षण याचा विचार करून खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदाच्या गणेशोत्सवात साताऱ्यात डॉल्बी सुरू झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे गणेशोत्सवात डीजे वाजणार कि नाही? याबाबत अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ध्वनिमर्यादेचे निर्बंध कायम ठेवले आहेत. ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत डॉल्बीवरील बंदी कायम राहणार असून, पोलीस अधिक्षकांच्या निर्णयानुसार मर्यादित आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यास मात्र जिल्ह्याधिकार्त्यांनी मंजुरी दिली आहे.

यंदाच्या उत्सवात तरी डिझेला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी डीजे चालकांकडून केली जात होती. त्याचबरोबर खा. उदयनराजे भोसले व आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील ध्वनी मर्यादेचे निर्बंध घालून डिजेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र पोलीस प्रशासनाने काही झाले तरी डिजेला परवानगी नाही, अशी भूमिका घेतल्याने गणेशोत्सवात डीजे दणाणणार नसल्याचेच स्पष्ट झाले असून, अखेर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी न्यायालय व ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार परवानगी देत असल्याचा सुधारित आदेश काढला आहे.त्यानुसार डॉल्बीला बंदी कायम राहणार आहे. दि. ३१ ऑगस्ट ते १० सपटंबर या कालावधीत केवळ ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार आहे. त्यालाही ध्वनी मर्यादा राहणार आहे. आवाजाची मर्यादा प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी, डीजे चालक -मालक कारवाईस पात्र ठरतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami