सातारा- सातारा शहर आणि उपनगरांतील गेल्या दोन-तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने गारठू लागले आहेत.बोचऱ्या थंडीमुळे अनेक ठिकाणी सायंकाळी आणि पहाटेपासून शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.तसेच संपूर्ण शहरावर सकाळी धुक्याचे साम्राज्य पसरलेले निदर्शनास येत आहे.तर बाजारात उबदार कपड्यांना मागणी वाढत चालली आहे.
खरे तर परतीच्या पावसाने काढता पाय घेताच साताऱ्यात थंडीने डोके वर काढले आहे.अगदी दुपारी बारा वाजेपर्यंत नदी,नाले आणि ओढ्याच्या परिसरात थंडीचा गारठा जाणवत आहे.थंडीमुळे बाजारात स्वेटर,जर्किन,हातमोजे,कानटोपी,मफलर,पायमोजे आणि ब्लांकेटची आवक वाढली आहे.या गरम कपड्याचा भाव २०० रुपयांपासून अडीच हजारापर्यंत सांगितला जात आहे.दरम्यान.ऐन थंडीत साखर कारखाने सुरू झाल्याने सातारा जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या परजिल्ह्यातून आलेल्या कामगारांना या थंडीचा सामना करताना मोठी कसरत करावी लागत आहे.या कामगारांच्या झोपड्यासमोर शेकोट्या पेटताना दिसत आहेत.ही थंडी शेकोटयानाही जुमानेसी झाली आहे.