संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

सातपुडा पर्वत रांगेतील चांदसैली घाटातील रस्ता खचण्याचे सत्र सुरूच

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नंदुरबार – जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकादायक पण प्रेक्षणीय समजल्या जाणाऱ्या चांदसैली घाटातील रस्ता खचण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे.
दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात पण रस्ता खचण्याचे प्रकार काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. या घाटातील संरक्षण कठडेच धोकादायक बनल्याने प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसत आहे.
शहादा तालुक्यातील आणि तळोदा ते धडगाव दरम्यान असलेल्या या चांदसैली घाटाला नागमोडी वळणे,खोल खोल दऱ्या आणि अरुंद रस्ता अशी सर्व धोकादायक पार्श्वभूमी लाभली आहे.या घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याचे दिसून येते.या घाटातील रस्ता आणि संरक्षण कठडे दुरुस्तीसाठी शासनाचे रस्ते बांधकाम खाते दरवर्षी पाण्यासारखा पैसा खर्च करत असते.पण हा खर्च पहिल्याच पावसात वाहून जात असतो.घाटातील रस्त्याला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडण्याचे प्रकार सुरूच असतात.सातत्याने खर्च करूनही या घाटाची दुरवस्था ‘जैसे थे ” राहत असल्याने शासनाकडून शासनाकडून केल्या जाणाऱ्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami