श्रीनगर- जम्मू- काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपाजवळ पाकिस्तानी झेंडा असलेला फुगा आढळून आल्याने परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी हा पाकिस्तानचा फुगा ताब्यात घेतला असून त्याची कसून तपासणी केली जात आहे.
सांबा जिल्ह्यातील गगवा परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ एक पांढर्या रंगाचा फुगा आकाशातून पडल्याची घटना घडली.त्यानंतर तेथील पेट्रोलपंप कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी हा विमानाच्या आकाराचा दिसणारा फुगा ताब्यात घेतला आणि तत्काळ त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याला कळवले.या फुग्यावर पाकिस्तानी झेंडा रेखाटला असून काही उर्दू भाषेतील मजकूरही दिसत आहे.वास्तविकता पोलिसांनी सांगितले की असे फुगे आढळण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधीही सीमेवरपलीकडून असे हिरव्या आणि पांढर्या रंगाचे फुगे सोडण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.