मुंबई : गुंड छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुट याला पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या अनिवासी भारतीयाच्या मालमत्तेची खोटी कागदपत्र तयार करुन सुमारे 25 कोटींची मालमत्ता बळकवल्याचा आरोप सलील फ्रुटवर आहे. या फसवणूकीच्या तक्रारीनंतर तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सलीमसह 4 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.खंडणी विरोधी पथकाचा याप्रकरणी तपास सुरु आहे.
टेरर फडिंगच्या आरोपाखाली सलीम फ्रुट याला एनआयएने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तो मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात होता. मात्र अनिवासी भारतीय अहमद युसुफ लंबार यांनी सलीमविरोधात फसवणूकीची तक्रार दिली होती. सलीमने बनावट कागदपत्रे बनवून ती कार्यालयात सादर केली आणि ही कागदपत्रे खरी असल्याचे भासविले. तक्रारदार अहमद यांच्या वडिलांच्या मालकीची स्थावर मालमत्ता आरोपींनी बळकावली होती. यात लम्बात बिल्डींग, उमरखाडी रोड, बाबुला टँक रोड याचा समावेश असून या माल
मत्तेची किंमत अंदाजे 25 कोटी रुपये आहे.त्यामुळे पोलिसांनी सलीमवर ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे.मुस्लिम असगरअली उमरेटवाला, शेरझादा जंगरेज खान, अस्लम अब्दुल रेहमान पटनी , रिजवान अलाउद्दीन शेख आणि सलीम फ्रुट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.