संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

सलग तिसर्‍या दिवशीही शेअर बाजार कोसळला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या सलग तिसर्‍या दिवशीही घसरण सुरुच राहिली. आज सेन्सेक्स सुरु होताच 153 अंकांनी घसरून 52,540.32 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीत 39.55 अंकांची घसरण झाली. निफ्टी 15,692.55 अंकांवर पोहोचला होता. गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असल्याने याचा मोठा फटका गुंतवणुकदारांना बसला आहे.

परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया आज कमजोरीसह उघडला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांच्या कमजोरीसह 78.05 रुपयांवर उघडला. त्याचवेळी, काल डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी मजबूत होऊन 77.98 रुपयांवर बंद झाला होता. सुरुवातीच्या व्यवहारात, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 43 अंकांनी किंवा 0.08 टक्क्यांनी घसरून 52,650 च्या पातळीवर उघडला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक घसरला. सध्या सेन्सेक्स 153 अंकांनी घसरून 52,540.32 च्या पातळीवर, तर निफ्टी 39.55 अंकांनी घसरून 15,692.55 च्या पातळीवर व्यवहार करत होता. आज बीएसईमध्ये एकूण 1,231 कंपन्यांमध्ये ट्रेडिंग सुरू झाले होते. त्यापैकी सुमारे 864 शेअर्स वाढीसह आणि 295 शेअर्स घसरणीसह उघडले. त्याच वेळी, 72 कंपन्यांच्या समभागांची किंमत वाढ किंवा कमी न करता उघडली. याशिवाय आज 25 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर तर 16 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami