संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

सर्व बँकांसाठी एकच हेल्पलाईन तक्रारींचे लवकर निवारण होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- आता सर्व सरकारी बँकासाठी एकच हेल्प लाईन असणार आहे. केंद्र सरकारने सर्व सरकारी बँकाना एकच हेल्पलाईन क्रमांक देण्यास सांगितले आहे.आतापर्यंत बँकेसंदर्भात काही तक्रारी असल्यास ग्राहकांना त्या-त्या बँकेच्या हेल्पलाईनवर किंवा बँकेच्या संपर्क क्रमांकावर तक्रार करावी लागत होती.मात्र या बँकेच्या हेल्पलाईनवर ग्राहकांच्या समस्या सोडवल्या जात नव्हत्या. यामुळे अनेकांनी केंद्र सरकारकडे याबाबत तक्रार केली होती.त्यानंतर केंद्र सरकारने याबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एकच राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू करण्यास सांगितलं आहे. तसेच हा हेल्पलाइन क्रमांक तीन ते चार अंकी असावा आणि या क्रमांकावर सर्व बँकांच्या तक्रारी करता येतील.या हेल्पलाईन क्रमांकावर अशी व्यवस्था असावी ज्यामध्ये ग्राहक आपली तक्रार कोणत्याही बँकेबाबत किंवा तिच्या कोणत्याही शाखेत किंवा विभागात नोंदवू शकेल. सप्टेंबरमध्ये या संदर्भात बँकांशी बोलणी झाली होती आणि आता या प्रस्तावावर काम सुरू करण्यात आले आहे.
बँकेच्या हेल्पलाइन किंवा संपर्क क्रमांकावर ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होत नसल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. यानंतर सरकारने बँकांना एकाच हेल्पलाईनची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. सर्व बँकांची माहिती एकाच हेल्पलाइनवर असेल. याशिवाय हेल्पलाईनवर तक्रार आल्यानंतर बँकाना ठराविक वेळेत ग्राहकांच्या समस्या सोडवाव्या लागतील.हेल्पलाइनच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami