संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

सर्व चर्चांना आम्ही तयार! शिंदे-फडणवीस यांना विश्वास

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : आज राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनॆक प्रकल्प, योजना यांना चालना दिल्याचे सांगताना, गेल्या सात महिन्यात बरेच धोरणात्मक निर्णय सरकारने घेतले आहे. त्यामुळे आजच्या चहापानावर विरोधकांनी बहिषकर टाकला असला तरी यापुढेही आमचे काम आम्ही सुरु ठेवणार असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. सर्व प्रकारच्या चर्चांना आम्ही तयार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पत्रकार शशिकांत वारीस हत्या प्रकरणाची वेगाने कअरवाई होत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अशोक चव्हाण, संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांचयवरील हल्ल्यावर देखील आपण ठाण्याच्या आयुक्तांशी चर्चा केल्याचे म्हटले. मात्र या प्रकारणाचा बाऊ करत विनाकारण सनसनाटी निर्माण करतात, राजकीय रंग दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या