नवी मुंबई – खारघर येथील सरस्वती महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडून नुकतेच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एनएसएस विभागाच्या ३० सदस्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत ओंकार काटकर पहिला आला असून दत्तात्रय जमखेडे दुसरा तर राहुल बर्मान तिसरा आला आहे.
तरुणांमध्ये निरोगी आयुष्याची जनजागृती होण्याकरता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे प्रत्येकाची जगण्याची पद्धत बदलली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा देशमुख, डॉ. सुनिता पाल, खेळ समन्वयक डॉ. दादासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.