संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

सरडेवाडी टोल नाक्यावर गावकर्‍यांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इंदापूर – लोखंडी उड्डाणपुलासह सेवा रस्ता संरक्षक भिंत उभारावी यासह विविध मागण्यांसाठी गावकर्‍यांसह विद्यार्थ्यांनीदेखील सरडेवाडी टोल नाक्यावर सोमवारी टोल वसुली आंदोलन केले. यावेळी सरडेवाडीचे सरपंच सीताराम जानकर, कर्मयोगीचे संचालक रवींद्र सरडे, नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे यांच्यासह उपसरपंच सतीश चित्राव, माजी उपसरपंच हनुमंत जामदाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान 13 जून रोजी सरडेवाडीचे सरपंच सीताराम जानकर यांच्या स्वाक्षरीने सरडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाहन मालकांच्या मागण्यांसंदर्भात या टोल प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनामध्ये त्यांनी आपल्या मागण्या व्यक्त केल्या होत्या. मात्र सरडेवाडी टोल प्रशासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने वाहन मालकांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. यावेळी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. न्याय व हक्कासाठी टोल बंद आंदोलनात पाच ते दहा वर्षाची शाळकरी मुले सहभागी झाली होती. स्थानिकांच्या भडकलेल्या भावना पाहता आंदोलन अधिक चिघळू नये, यासाठी इंदापूरचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी मध्यस्थी केली. टोल प्रशासनाकडून आठ दिवसात मागण्यांसंदर्भात बैठक लावली जाईल आणि त्यातून मार्ग काढला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यांनतर हे आंदोलन स्थगित
करण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami