संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

सरकार अडचणीत असताना शेतकऱ्यांसाठी 50 हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- ठाकरे सरकार अडचणीत असताना महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नियमितपणे कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 50 हजारपर्यंत अनुदान दिले जाणार असल्याचे सांगितले आहे.

1 जुलैला वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शुभारंभ होणार असल्याचेही कॅबीनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना हा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संगणकीय प्रणाली पुर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या सर्व बाबी लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत. नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने पुढच्या दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेत नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करतानाच यंदाचे वर्ष महिला शेतकरी- शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami