संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

सरकारने फ्री शीप रद्द केली! ओबीसी  जनमोर्चातर्फे निषेध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- महाविकास आघाडी सरकारने परराज्यात शिक्षणासाठी सुरु केलेली फ्री शीप योजना राज्य सरकारने रद्द केली आहे. ओबीसी बहुजन कल्याण विभागाने परिपत्रक काढून सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा ओबीसी जनमोर्चा निषेध करत असून हा निर्णय राज्य सरकारने त्वरित मागे घ्यावा अशी मागणी ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी केली आहे.
परराज्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसोबत राज्याची फ्री शीप योजना सुरू केली होती. या योजनेअतंर्गत ओबीसी विद्यार्थ्यांना पराज्यात शिक्षणासाठी येणारा खर्च आणि परिक्षेचा खर्च देण्यात येत होता. ओबीसी समाजातील ८ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे बावकर यांनी म्हटले आहे. शिष्यवृत्ती योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. एका लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांकारिता ही योजना राबविल्या जाते.यात विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता म्हणजेच मेंटनंस अलाऊन्स दिला जातो. याच धर्तीवर ३१ मार्च २०१६ रोजी राज्य सरकारने फ्रीशिप योजना राबविण्याचे धोरण निश्चित केले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात २५ मार्च २०२२ रोजी ओबीसी बहुजन कल्याण विभागामार्फत परिपत्रक काढून शिष्यवृत्ती आणि फ्रीशिप या दोन्ही योजना ओबीसी,एसबीसी, व्हिजे, एनटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू राहतील असे आदेश काढण्यात आले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami