संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर पंचामृत अभिषेक बंद! मंदिर, प्रशासनाचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक:- सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर पंचामृत अभिषेक बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून शेंदूर काढल्यानंतर दररोज होणारा पंचामृत अभिषेक देवीच्या मूर्तीवर आता होणार नाही. नियमित होणाऱ्या अभिषेकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार आणि भाविकांच्या योगदानातून तयार करण्यात आलेल्या चांदीच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. देणगीदार भाविकांनी दिलेल्या देणगीतून २५ किलो चांदीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. या मुर्तीवर पंचामृत महापूजा करण्यात येईल.

दरम्यान देवीच्या मूळ स्वरूपाला पुन्हा कोणतीही इजा होऊ नये किंवा त्यात बदल होऊ नये म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.भक्तांनी सदर पंचामृत महापुजा संबंधीत बदल विचारात घेवुन विश्वस्त संस्थेला योग्य ते सहकार्य दयावे असे नम्र विनंती विश्वस्त संस्था, पुजारी वर्ग, स्थानिक ग्रामस्थ तसेच विश्वस्त संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने करण्यात येत आहे. तसेच श्री भगवतीचे मुळ तेजोमय स्वरूपाचे जपवणुक व जतन करण्याची संपुर्ण जबाबदारी ही विश्वस्त संस्था, पुजारी वर्गाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami