संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलू नका! राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाबद्दल निर्णय घेतल्यानंतर इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यावर भाष्य केले. यात राज ठाकरे यांनीही मनसैनिकांना धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आदेश दिले आहेत. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये,असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे.
अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे.या निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यावर मनसेचे आमदार राजू पाटील, नवी मुंबईतील नेते गजानन काळे आणि संदीप देशपांडे यांनी भूमिका मांडली होती. मात्र, आता याबाबत राज ठाकरेंनी स्वत: सर्व मनसैनिकांसाठी नवा आदेश दिला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर काही बोलू अथवा लिहू नका, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असे राज ठाकरेंनी म्हटले. त्यामुळे आता जेव्हा राज ठाकरे बोलतील तिच मनसेची अधिकृत भूमिका असेल,असे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे रविवारी रात्री केलेल्या या आवाहानावर नेटकर्‍यांनी कमेंट करायला सुरुवात केली.’गु़ड मॉर्निंग’ अशी कमेंट करत उशिरा जाग आल्याचे सुचवित मनसेबरोबरच मनसेच्या नेत्यांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami