मुंबई- सदिच्छा साने हत्या प्रकरणातील आरोपी मिटू सिंग आणि जब्बार अन्सारींना किला कोर्टाने न्यायालयीन कोठडी रवानगी आहे. याआधी हे आरोपी पोलीस कोठडीत होते. पोलीस तपासात अद्याप घटनेचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे आता आरोपीची ‘लाय डिटेक्टर टेस्टकरण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज केला आहे. पालघरमधील मेडिकलची विद्यार्थी सदिच्छा सानेच्या हत्या प्रकरणात पोलिसांना तपासाला वेग मिळत नाही. अनेक दिवसांपासून पोलीस कसून चौकशी करत आहेत. तरी देखील गुन्ह्याचा हेतू अजूनही स्पष्ट झालेला नाही. सदिच्छचा मृतदेहच ही सापडला नाही. आरोपी पोलिसांना कोणतेही सहकार्य करत नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास तांत्रिक पुराव्याभोवती भरकटत आहे. त्यासोबत वेळ खूप वाया जात आहे. आरोपीची ‘लाय डिटेक्टर टेस्ट
करण्यासाठी पोलिसांनी आता कोर्टात धाव घेतली असून याबाबत अर्ज केला आहे.