संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

सत्येंद्र जैनांच्या मित्राच्या घरावर ईडीची धाड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (57) यांच्या मित्राच्या घरातून ईडी 2.82 कोटींची रोकड जप्‍त केली. तसेच एक किलोहून अधिक सोनेही आढळून आले आहे. यामध्ये 133 सोन्याच्या नाण्यांचा समावेश आहे. त्यामुळे 30 मे रोजी अटकेत जैन यांना मोठा झटका बसला आहे.

त्यांना 9 जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. एप्रिलमध्ये ईडीने चौकशीचा भाग म्हणून सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाची 4.81 कोटींची मालमत्ता, त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्या जप्त केल्या होत्या. ईडीने निवेदनात म्हटले आहे की, पीएमएलएअंतर्गत अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रयास इन्फोसोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, मंगलायतन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, जेजे आयडियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर धाडी टाकल्या आहे. प्रसाद जैन यांच्या पत्नी सुशीला जैन आणि सुनील जैन यांच्या पत्नी इंदू जैन यांच्या 4.81 कोटींच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami