संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही – एकनाथ शिंदे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – विधानपरिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजपाने पाचही जागा जिंकल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडल्यास स्पष्ट झाले आहे. अशातच शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे कालपासून जवळपास ३५ आमदारांसोबत सुरतला गेले असून शिवसेनेत मोठं बंड समोर आलं आहे. यादरम्यान विविध चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. मात्र आता एकनाथ शिंदे यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. त्यांनी ट्विटमधून आपली पुढील दिशा स्पष्ट केली आहे.

‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत…बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही’, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami