संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचे
रणजी ट्रॉफीत गोवा संघातून पदार्पण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भारताचा माजी क्रिकेटरपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आज रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आहे. अर्जुन महाराष्ट्रातील संघाकडून नाही तर गोवा संघाकडून क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. राजस्थानविरुद्ध गोव्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्जुनचा समावेश करण्यात असून दोन्ही संघांमधील हा सामना गोवा क्रिकेट असोसिएशन अकादमीच्या मैदानावर खेळवला गेला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने अर्जुन तेंडुलकरला राज्य बदलण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. याबाबत गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिन विपुल फडके म्हणाले, अर्जुन तेंडुलकरला आगामी हंगामात गोव्याकडून खेळायचे होते. त्यासाठी त्यांने संपर्क साधला. आम्ही यावर उत्तर देले होते की आधी एमसीएकडून एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र द्या. त्यानंतर आम्ही तुमचे कौशल्य आणि फिटनेस तपासू. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यावर अखेर अर्जूननं गोवा संघात पदार्पण केलं.
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवल्या जात असलेल्या कालच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोव्याच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नव्हती. गोव्याने अवघ्या 32 धावांवर पहिली विकेट गमावली होती. काल पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गोव्याने 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. सुयश प्रभुदेसाई 81 आणि अर्जुन तेंडुलकर 4 धावांवर नाबाद होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami