संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

संसद व उत्तरेतील राज्यांची महिलांना आरक्षण देण्याची मानसिकता नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्याची संसद आणि उत्तरेतील राज्यांची मानसिकता नाही, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे मांडले. माझ्या मते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. हा मुद्दा मी संसदेत सातत्याने मांडत आहे. काँग्रेसचा खासदार असल्यापासून माझा महिला आरक्षणाचा आग्रह कायम आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने पुण्यात ‘सिंगल डॉटर फॅमिली’ उपक्रमात एकच मुलगी असलेल्या दाम्पत्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अशा दांपत्याचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी महिला आरक्षण, महिला सबलीकरण अशा विषयावर आपले मत मांडले. ५० वर्षांच्या काळात महिला धोरणात झालेले बदल त्यांनी यावेळी अधोरेखित केले. त्यांनी काही गंमतीदार किस्से सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय अनेकांना मान्य नव्हता. भोरमध्ये मला एका सरपंचाने सांगितले की तुमच्या या निर्णयामुळे आता कारभार बायकांच्या हातात जाणार. आणि आम्ही फक्त बघत बसायचे का? हे योग्य नाही. तेव्हा मी त्याला अमेरिकेतील घटनेचे उदाहरण दिले. संरक्षण मंत्री म्हणून अमेरिकेला गेलो तेव्हा तेथे सैन्य दलातील मुलींच्या तुकडीने मला सलामी दिली. त्यावेळी मी तिन्ही दलाच्या प्रमुखांना भारतीय सैन्यात महिलांना संधी देण्याचा प्रस्ताव दिला. मात्र त्यांनी तो अमान्य केला. शेवटी निर्णय घेण्याचा माझा अधिकार आहे. म्हणून मी लष्करात महिलांना ११ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. महिलांना आरक्षण मिळावे यासाठी मी सातत्याने संसदेत आवाज उठवतोय. काँग्रेस खासदार असल्यापासून माझे हे मत मी मांडत आहे. परंतु उत्तरेतील राज्ये आणि संसदेची महिलांना आरक्षण देण्याची मानसिकता नाही, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami