न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या लॉनमध्ये परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्र लॉनमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले.प्रख्यात कारागीर पद्मश्री पुरस्कारप्राप्त रामसुतार यांनी बनवलेली ही प्रतिमा भारताने संयुक्त राष्ट्रांना भेट म्हणून दिली आहे. रामसुतार यांनीच गुजरातमध्ये स्थापन केलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा पूर्णाकृती पुतळा साकारला आहे.
यावेळी परराष्ट्रमंत्री डॉ. एस.एस जयशंकर म्हणाले की, ” संपूर्ण जग हे आणीबाणी, युद्धे आणि हिंसाचारातून जात आहे, संघर्ष करत आहे.त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मार्ग दाखवण्यासाठी महात्मा गांधींच्या आदर्शांची अजूनही गरज आहे. साथीचे रोग, हवामान बदल, संघर्षांच्या आव्हानांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यावर संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता आहे. आपण यावर मार्ग शोधत आहोत, मग अशा धोक्यांना नॉर्मल करण्याच्या प्रयत्नांना आपण स्वीकारू नये. आजपर्यंत असा प्रश्न उद्भवला नाही की संपूर्ण जग जे स्वीकारत नाही, ते समर्थन करण्याचा प्रयत्न का केला जात आहे. सीमेपलीकडील दहशतवादाला जे प्रोत्साहन देतात त्यांना हेदेखील लागू होते.” असे डॉ. एस. जयशंकर यावेळी म्हणाले.