नाशिक : आज सप्तश्रृंगी देवस्थानच्या व्यवस्थानाविरोधात संप्तश्रृंगी गड बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांकडून घेण्यात आला.व्यवस्थापनाकडून सध्या मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांना डावलून सुरक्षा रक्षक नेमल्याचा आरोप त्यांनी केला असून गडावरची दुकाने बंद ठेवून ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून संप्तश्रृंगी देवस्थानच्या व्यवस्थापनाविरोधात ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.याआधी देखील अशाप्रकारचे उठाव सप्तश्रृंगी गडावर झाले होते.मात्र काही दिवसांपूर्वी गडावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली.जे देवस्थानचे जुने सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यापेक्षा जास्त वेतन देण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे नवीन लोकांना नियुक्त करण्यात येत होती तेव्हा गावातील तरुणांचा विचार केला असता तर अधिक बरे झाले असते,अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्याचबरोबर व्यवस्थापाबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत.त्यामुळे कुठल्याही कामात विचारात न घेता मनमानी कारभार केला जातो,असे आरोप करण्यात आले होते.त्याबाबतचा असंतोष आज उफाळून आला. त्यामुळे गडावरील व्यवहार बंद ठेवण्यात आले.ग्रामस्थांनी आज रस्त्यावर उतरुन देवस्थान व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी देत कडकडीत बंद पाळला.