संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

संपामुळे जर्मनीतील हवाई प्रवास विस्कळीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बर्लिन : जर्मनीच्या चार प्रमुख विमानतळांवर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी केलेल्या संपामुळे येथील हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. जर्मन एअरपोर्ट असोसिएशन नुसार एकूण ३५१ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. १००,००० प्रवाशांना याचा फटका बसला आहे. संपाची घोषणा आयत्यावेळी करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना याची कल्पना नसल्यामुळे ऐनवेळी प्रवाशांकडे कोणताही पर्याय उरला नसल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.

जर्मन एअरपोर्ट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी राल्फ बिसेल यांनी सांगितले की जर्मनीतील महागाईचा तडाखा टाळण्यासाठी युनियन आपल्या कामगारांसाठी १०.०५ टक्के किंवा किमान ५०० युरो वेतनवाढीची मागणी करत आहे. मात्र यावर कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे मात्र कामगारांशी कोणताही अर्थपूर्ण करार न झाल्यास परिस्थती याहूनही गंभीर असेल असे सूचित केले आहे.

दरम्यान, कामगारांनी वाढीव वेतनाच्या मागणीसाठी संप पुकारल्यानंतर जर्मनीतील विमानतळांवर हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली. संपाचा फटका हवाई प्रवासावर बसल्याने एकट्या बर्लिन ब्रँडनबर्ग विमानतळावर, २७,००० प्रवाशांना याचा फटका बसला आहे. २०० उड्डाणे रद्द करण्यात आले. हॅम्बुर्गमध्ये, सर्व १२३उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. तर हॅनोवर आणि ब्रेमेनमध्येही हवाई उड्डाण बंद करण्यात आले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या