संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

संतोष बांगर यांना ठाकरेंचा दणका; शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना अनेकदा परतण्याचे आवाहन केले. मात्र या प्रयत्नांना यश न आल्याने आता शिवसेनेने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का दिला असून त्यांना हिंगोली जिल्हा शिवसेना प्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे.

संतोष बांगर हे बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन करताना भावुक झाले होते. मात्र तेच बांगर विश्वासदर्शक ठरावात ऐनवेळी शिंदे गटात जाऊन बसले होते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच हिंगोलीत शिवसैनिकांकडूनही त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त होत होती. २००९ पासून संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. आता त्यांना या पदावरून हटवण्यात आले आहे. तसेच आता नवीन जिल्हा प्रमुख निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचपणी करत आहे.

दरम्यान, शिवसेनेचे सोलापूरमधील आमदार तानाजी सावंत यांच्याविरोधतही शिवसेनेने कठोर कारवाई केली आहे. सावंत हेदेखील बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये मुक्कामी होते. याच कारणामुळे त्यांना सोलापूर संपर्कप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता मुंबईतील माजी नगरसेवक अनिल कोकळे यांची सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी सावंत हे सोलापूरच्या भूम परंडा या मतदारसंघातून आमदार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami